
दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने केलेल्या या कामगिरीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. PTI च्या माहितीनुसार, “भारत पुढील पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट बनेल”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.
