
पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.

अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली आहे.अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी माहिती विलास लांडे यांनी दिली आहे.
