
मुंबई : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातात 200 हून अधिक प्रवासी ठार झाले. 900 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. साधी ट्रेन चालवता येत नाही. रेल्वेत सुविधा दिल्या जात नाहीत अन् बुलेट ट्रेन आणल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे. या देशात असं कधी झालं नाही. जिथे सीबीआय चौकशी करायची तिथं करत नाही. आम्ही भाजपला पुरावे दिले. पण चौकशी नाही. मुळात सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. पंतप्रधान राजीनामा देणार आहात? जबाबदारी कोण घेणार?अपघाताचं इव्हेंट करणारं हे सरकार आहे. स्मशानातही तुम्ही इव्हेंट करत आहात?, असा सवाल संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
