स्वत:ला असली शिवसेना म्हणताना मग दिल्लीत कशाला जाता? ; संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिल्लीवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? स्वत:ला असली शिवसेना म्हणताना मग दिल्लीत कशाला जाता? बाळासाहेब ठाकरे विस्तारासाठी कधी दिल्लीत जायचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

एकनाथ शिंदे यांचं हायकमांड पूर्वी महाराष्ट्रात होतं. आता शिंदेंचं हायकमांड दिल्लीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची चर्चा करतात. आमची शिवसेना म्हणतात. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि दिल्लीत जाऊन मुजरा करतात. असली शिवसेना कधी दिल्लीत झुकली नाही. विस्तारासाठी तिकडे जातात. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणता तर दिल्लीत जाण्याची गरज नाही. इथले निर्णय इथेच झाले पाहिजे. आम्ही दिल्लीची गुलामी केली नाही. तुमची शिवसेना असली आहे तर झुकता कशाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

🤙 8080365706