
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती.सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती.
