अंदमान निकोबार बेटात लवकरच मान्सूनचे आगमन

मुंबई : लांबणीवर गेलेला आता मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच आयएमडी आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांकडून यंदाच्या मान्सूनची तारीख लांबणीवर पडल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, त्यातच आता मान्सून अंदमानात वेळतच दाखल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथून पुढं म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 3 ते 4 जूनपर्यंत दाखल होईल. आणि त्यानंतरच काही दिवसांनी तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचणार आहे.

🤙 8080365706