
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.

यामुळे राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व १८ जागा ते लढवणार असून इतर काही जागांवरही दावा करणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले. महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फार्मूला अजून ठरलेला नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
