
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.आता नव्या अध्यक्षांची निवड गुरुवारी 25 मे रोजी केली जाणार आहे.

नव्या अध्यक्षपदासाठी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे रोजी अध्यक्ष निवडीची केवळ औपचारिकता पार पाडली जाणार आहे.• ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच विश्वास पाटलांचा राजीनामाअध्यक्ष निवडीसाठी पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) डॉ. महेश कदम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विश्वास पाटील यांनी ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार आपल्या पदाचा राजीनामा दोन वर्षांनी दिला आहे. नेत्यांना त्यांनी दोन वर्षांचा शब्द दिला होता. विश्वास पाटील यांनी ‘गोकुळ’चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत हा राजीनामा मंजूर करण्यात आला.
