वि.मं.बहिरेश्वर,वि मं म्हारूळ, संयुक्त न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न….

बहिरेश्वर : मौजे बहिरेश्वर व मौजे म्हारुळ येथील सन 1987 साली पहिलीत प्रवेश घेतलेली व 1997/98 साली इयत्ता 10 वी ची बोर्ड परीक्षा देवून आपाआपल्या आयुष्याच्या वाटेवर विभागलेली मुल/मुली आज तब्बल 26 वर्षानंतर आपल्या गुरूजनांसमवेत एकत्रित आली होतीत.

सकाळी 10 वाजता जमा झालेली मुल/मुली आणि गूरूजन सायंकाळी पाच वाजेपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते. कोणालाही हा कार्यक्रम सोडून जाऊ वाटत नव्हतं.जणु प्रत्येकाचा पाय अडखळत होता असं स्पष्ट जाणवत होत पण नाईलाज होता सगळ्यांचा प्रपंच मागे वाट पाहत होता… त्यामुळे प्रत्येकाला जाण भागच होत. पण या अविस्मरणीय क्षणांचे जे जे साक्षीदार होते त्यांचे चेहरे या समारंभाने जणू खुलले होते.

प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्यांनी चिखलाच्या गोळ्याला आकार देवून माध्यमिक शिक्षकांच्या ताब्यात दिल ते वय होतं अवघ 14 ते 16 वर्षाचं आणि या वयात विद्यार्थी थोडा भांबावलेला असतो कारण या वयात त्याच्यात मानसिक आणि शारीरिक बदल घडत असतो आणि या वयात विद्यार्थी कळत न कळत चूकीचे पाऊल उचलु शकतो पण यावेळीच योग्य मार्गदर्शन मिळण गरजेच असत आणि अस योग्य मार्गदर्शन करणारे माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन या बॅचच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्यावेळचे मुख्याध्यापक एम के आळवेकर सर होते.

मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.तद्नंतर शाळेतील त्यावेळी म्हणली जाणारी प्रार्थना *खरा तो एकची धर्म* व राष्ट्रगीत घेण्यात आले…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी सध्या सांगली महानगर पालिका सहा आयुक्त अशोक कुंभार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी धनाजी दिंडे यांनी तर उपस्थितांचे स्वागत पत्रकार सरदार पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी /विद्यार्थिनीनी आपली मनोगते व जून्या आठवणींना उजाळा दिला. जवळपास 75 विद्यार्थी/विद्यार्थीनींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

काहीजण सर्व संसार विसरून आपल्या बालपणाच्या आठवणीत रममाण झाला होता.तर काही जण आपल्या मोबाईल मध्ये या सूवर्ण क्षणांची छबी कैद करण्यात गूंग झाले होते.यावेळी सर्व शिक्षकांना फेटा,गूलाबपुष्ष,व झाडांची रोपे देवून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला तद्नंतर स्नेहभोजन करून समारंभाची सांगता करण्यात आली… या कार्यक्रमास वि मं बहिरेश्वर शाळेतील आनंदा शिंदे गुरूजी,मणेर गुरूजी,कांबळे गुरूजी,एस.के चौगले गूरूजी, एकनाथ चौगले गूरूजी,नाळे गूरूजी,के.टी जाधव गूरूजी,तर वि मं म्हारूळ येथील युवराज पाटील गूरूजी,खाडे गूरूजी,चौगले गूरूजी,तसेच माध्यमिक शाळेतील मर्दाने सर,सूतार सर,के.बी पाटील सर,ए एन पाटील सर,बी.एल पाटील सर,एस बी पाटील सर ,भोसले सर, व न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वर शाळेतील विद्यमान मुख्याध्यापक खाडे सर तसेच शिपाई हिंदुराव बापु,अशोक नाळे आदी उपस्थित होते. आभार पत्रकार सरदार पाटील यांनी मानले.

🤙 8080365706