बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांना उद्योग भूषण पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : राज्यातील मराठी उद्योजकांच्या अडचणींना सोडविण्यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. मराठी माणसाची होणारी आर्थिक व व्यावसायिक पिछेहाट थांबवून त्यांना उद्यमशील बनवण्यासाठी सोमवारी २२ मे रोजी सायंकाळी 4 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहामध्ये, मराठी उद्योजकीच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मराठी उद्योजकांना उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची महिती मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात कोल्हापुरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसाय अजयसिंह देसाई यांना उद्योग भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठी माणसाच्या व्यवसाय उद्योगवाढीसाठी त्यांना एकत्रित आणून अधिक सक्रीय करण्यासाठी गेली ४२ वर्षे हे चेंबर मुंबई येथे कार्यरत आहे. या संस्थेच्या कोल्हापूर शाखेची स्थापना करण्यात आली असून याच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून, त्यांची ओळख होऊन अडचणी दूर कराव्यात हा उद्देश आहे. तसेच मराठी लहान मोठ्या उद्योजकांचे कामगार प्रश्न, आर्थिक अडचण व व्यवसाय वृध्दीसाठी मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे उद्योजक संग्राम पाटील (मार्कलस इंजिनियर्स) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे सल्लागार आदेश बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात उद्योजक अजयसिंह देसाई (बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स), वैशाली जाधव (विश्वकर्मा फौंडर्स), उदय लोखंडे (पॉप्युलर ऑटोमोबाईल), सर्जेराव यादव (सर्जेराव यादव प्रतिष्ठान इस्लामपूर), सोनाली चिपडे (चिपडे सराफ) या मराठी उद्योजकांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस शाखा अध्यक्ष राजन चौगुले, शाखा कार्यवाह बाबा खोडवे, कोल्हापूर शाखा समिती सदस्य धनंजय पाटील, मोहन वायगंडे, सुशील हजे, रवी हुन्नुरे, उतम पाटील, तुषार पाटील, स्वप्नजा घाटगे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706