
नवी दिल्ली : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बैलगाडा शर्यती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीबद्दलचा सुप्रीम मार्ग मोकळा झाला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
