कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं

नवी दिल्ली : देशातील राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मोदी सरकारचा हा निर्णय किरेन रिजीजू यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे किरेन रिजीजू आता कायदा मंत्री राहणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्याकडे भू विज्ञान मंत्रालय देण्यात आलं आहे. तर अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा आणि न्याय मंत्रालय देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे या खात्याचा स्वतंत्र प्रभार असणार आहे.

🤙 8080365706