पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’ चे रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुण्यात सुरु झालेल्या मेट्रोला ‘मावळा पगडी’चे रूप दिले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. यासंदर्भातील छायाचित्र मेट्रोने जारी केले आहेत.

पुणे मेट्रो मार्गावरील स्थानक उभारले जात आहे. या स्थानकाला मावळा पगडीचा लुक दिला गेला आहे. शहरातील विविध मेट्रो स्थानकांना शहराची ओळख निर्माण करुन देणारे पारंपरिक लुक देण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. त्यानुसार मेट्रो स्थानकाची रचना केली जात आहे. पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर ऐतिहासिक ‘मावळा पगडी’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मावळा पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक असून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

🤙 8080365706