
कागल: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांचा लाभ थेट त्यांच्या खात्यांवर वर्ग करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.तथापि शासनाच्या या योजनांपासून कागल विधानसभा मतदार संघातील एक ही लाभार्थी वंचित राहणार नाही,त्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दिली.
कागल येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून घरकुल मंजूर झालेल्या 46 लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे तसेच मयत झालेल्या बांधकाम कामगारांच्या 7 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे मदतीच्या मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.

यावेळी घरकुल मंजूर झालेले पाच लाभार्थी यामध्ये श्री शंकर कुंडलिक डाफळे ( सावर्डे खुर्द),सुमन शिवाजी हजारे (ठाणेवाडी),श्रीमती कविता अण्णासो हसुरकर (ठाणेवाडी), इंदुबाई रामचंद्र पाटील (बेलेवाडी काळमा) ,सदाशिव राऊ पाटील (सावर्डे बुद्रुक)यांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे रक्कम मंजूर झाली आहे त्या मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले . तसेच मयत बांधकाम कामगारांचे वारस श्री सागर बाळकृष्ण पाटील (मळगे खुर्द), सुनिता गौतम चव्हाण (पिंपळगाव बुद्रुक), मंगल आनंदा क्षीरसागर (हिरलगे ता. गडहिंग्लज), कमल विश्वास पाटील (झुलपेवाडी ता. आजरा), खुशहाबी रमजान फकीर ( बेलवळे बु.) यांनाही मंजूर झालेल्या मदतपत्रांचे वाटप करण्यात आले.
घाटगे म्हणाले,गेल्या एक वर्षापासून 35 हजारांहून अधिक बांधकाम कामगारांना पेट्यांचे वाटप मतदारसंघात केले आहे. तळागाळातील जनतेसाठी अत्यंत नि:स्वार्थीपणे केलेल्या कामामुळेच जनादाराचा रेटा आपल्यामागे दिवसेंदिवस वाढत असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शाहू कारखान्याचे संचालक सतीश पाटील, प्रताप पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदू माळकर, संचालक राजेंद्र जाधव, वाय.टी.पाटील.(चिखली), भैय्या इंगळे,पी.डी. चौगुले (म्हाकवे), संदेश पाटील ,संतोष गायकवाड (बिद्री), संदीप बोटे, विनायक मांगोरे,वैभव नरके तसेच कार्यकर्ते, लाभार्थी महीला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले.आभार बेलवळे बु.चे माजी सरपंच दिलीप पाटील यांनी मानले..
कार्यकर्ते,पेज प्रमुख,बुथ प्रमुखांमुळे ऊर्जा
घाटगे म्हणाले, स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमोघ कर्तृत्वातून उभारलेले स्वाभिमानी कार्यकर्ते आणि आज तळागाळापर्यंत अग्रक्रमाने काम करणारे पेज प्रमुख, बुथ प्रमुखांमुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळते.त्यांच्या या समग्र कार्यामुळेच तळागाळातील शेवटचा घटक आज मुख्य प्रवाहात येत आहे ही बाब ख-या अर्थाने माझ्यासाठी खूप समाधानाची आहे..
