राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले तर उपाध्यक्षपदी अजित पाटील

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्टस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले यांची तर उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी संचालक रवींद्र पंदारे यांनी शशिकांत तिवले यांचे नाव सुचवले त्याला मधुकर पाटील यांनी अनुमोदन दिले.तर संचालक रोहित प्रकाश बांदिवडेकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अजित पाटील यांचे नाव सुचवले त्याला संचालक विलासराव कुरणे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने नीलकंठ करे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी मनोगते व्यक्त केली. नूतन अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून बँकेच्या प्रगतीचा आलेख आणखीन उंचावण्याकरिता कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये गटनेते रवींद्र पंदारे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड अतिशय उत्तम प्रकारे सुरू असून रिझर्व बँकेच्या बदलत्या धोरणांचा अवलंब करून बँकेची प्रगती करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

🤙 8080365706