
कोल्हापूर : करणी केल्याच्या संशयातून मद्यधुंद अवस्थेतील निखिल पिंटू गवळी ( वय 22, रा. टेंबलाई नाका ) याने घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली.

आझाद मुकबुल मुलतानी (वय 48 वर्षे रा. टेंबलाई नाका, झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या सासर्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफसाना असिफ मुलतानी (वय 22 )या त्यांच्या सूनेवराही वार केल्याने त्या सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्लेखोर निखिल रवींद्र गवळी (वय 22 वर्षे) स्वत:हून राजाराम पोलिसांकडे हजर झाला. त्यामुळे या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुटुंब जेवत असतानाच तलवारीचे घाव घातल्याने घरात रक्ताचा सडाच पसरला होता. टेंबलाई उड्डाणपुलाशेजारी असलेल्या बीएसएनएल टॉवरसमोर असलेल्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली.
