अतिक्रमण मुद्यावरून शिये ग्रामपंचायतीचे आणखी दोन सदस्य अपात्र

शिये : शिवाजी गाडवे यांना काही महिन्यापूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरूनच अपात्र ठरविण्यात आले होते.आता याच अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शिये, ता. करवीर ग्रामपंचायतीचे आणखीन दोन सदस्य अपात्र घोषित करण्यात आले.

हंबीरराव कोळी व दत्तात्रय शिंदे अशी अपात्र झालेल्या सदस्यांची नावे आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात या प्रकरणाबाबत योगेश पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. यावर निर्णय देताना जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित सदस्यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे सतरा सदस्य असणाऱ्या शिये ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून तीन सदस्य अपात्र ठरले आहेत. तर आणखीन काही सदस्यांवर याच मुद्द्यावरून अपात्रतेची टांगती तलवार आहे. या निर्णयाविरोधात आपण विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे अपात्र ठरलेले सदस्य हंबीरराव कोळी व दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

🤙 8080365706