
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : थोरामोठ्यांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
वृषभ : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मिथुन: वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल.
सिंह : उमेद वाढेल. मन आशावादी, आनंदी राहील. भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. व्यवसायात यश लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तूळ : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. पत्रव्यवहार होईल.
धनू : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : व्यापारात, व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.
मकर : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात यश मिळेल.
कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. विवाहेच्छूंचे विवाह जमतील.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.
