
कोल्हापूर : महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, कुटुंब कल्याण केंद्र क्र.5 कसबा बावडा व हिंदु-ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात 242 रुग्णांनी लाभ घेतला.

त्याचबरोबर महात्मा ज्योतीबा फुले जन-आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 रुग्णांची नोंदणी या शिबरात करण्यात आली. मंगळवारी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 पर्यंत पितळी गणपती ताराबाई पार्क हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सकाळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यामध्ये शिबीरा मेडिसीन विभाग 46, अस्थिव्यंग तज्ञ विभाग 27, बाल विभाग 25, स्त्री रोग विभाग 22, जनरल सर्जरी 10, नेत्ररोग विभाग 45, फुप्पुसाचे एक्सरे 10, रक्तदाब 23, मधूमेह 34 रुग्णांची तपासणी झाली.या शिबीरामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ.पुलकित खंबायते, डॉ.सुनिता पाटील, बालरोग तज्ञ डॉ. रुचिका यादव, डॉ. मंदार पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुरेखा आडनाईक, सर्जन डॉ. आशा जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव, चेस्ट फिजीशियन डॉ.रुपाली दळवी व नर्सिंग स्टाफ यांनी आलेल्या रुग्णाची तपासणी केली. यामध्ये एक्स-रे, रक्त लगवी तपासणी, क्षयरोग तपासणी, थुंकी तपासणी अशा मोफत तपासण्या करण्यात आलेल्या. या तपासण्या झालेनंतर रुग्णांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंमसेविका यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली होती.यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसुळ, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, पंचगंगा रुग्णालयाच्या प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्या काळे- हेरवाडे, नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने उपस्थित होते.
