
इचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील जयहिंद क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेचा पूर्ण जिल्ह्याला अभिमान असून दिवंगत खेळाडूंच्या स्मृती जपण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या स्मृती जपण्यासाठी खेळाडूंच्या स्मृतीसंग्रहालयाची उभारणी केली पाहिजे , असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजीच्या कामगारांसाठी इंटक उभारणीमध्ये स्वर्गीय देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांचा मोलाचा वाटा आहे. देशभक्त बाबासाहेब खंजिरे हे करारी आणि ध्येयवादी नेते होतेच पण तितकेच गुणवंत खेळाडूही होते.इचलकरंजीतील क्रीडा मंडळांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गारही यावेळी आवाडे यांनी काढले.यावेळी मा.आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, अशोकराव स्वामी, रणजित कदम, गंगाराम जाधव, प्रकाश दत्तवाडे, संभाजीराव पाटील, संजय कल्याणकर, संजय कांबळे, बाबासाहेब कलागते, महादेव कांबळे, सतिशभाऊ डाळ्या, अरुणराव खंजिरे, शामराव कुलकर्णी, सदा मलाबादे, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.
