
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे कमळ हाती घेणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. भाजपकडून राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशोक टेकवडे हे मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
