खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला बंद

सिंहगड – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या डीआयएटी येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत ही दोन्हीही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार असून याबाबत हवेली पोलीस व वन विभागाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक मात्र तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दौरा आहे. रविवारच्या सुट्टीमुळे खडकवासला व सिंहगड या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात व परिणामी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी (15 मे रोजी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

🤙 8080365706