नवनिर्वाचित काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

कर्नाटक : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने एकूण १३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी आज (रविवार) संध्याकाळी बेंगळुरू येथील हॉटेल शांग्रीला येथे नवनिर्वाचित काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या घराबाहेर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जमले आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले.काँग्रेसने मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यामध्ये जेष्ठ काँग्रेसनेते सुशिल कुमार शिंदे यांचा सहभाग आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांची काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षक उपस्थित राहणार असून, ते पक्षाच्या हायकमांडला अहवाल सादर करतील.

🤙 8080365706