
मुंबई : युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली.

रविवारी सकाळी झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधालं आलं आहे. 2024 मधील विरोधी एकजुटीच्या दिशेने हे पाऊल असल्याचे या बैठकीबाबत बोलले जात आहे.गेल्या काही काळापासून विरोधक एकजूट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याबाबत अनेक बैठका झाल्या, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. विरोधकांच्या ऐक्याबाबतची ही आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला आदित्य ठाकरेंसोबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या.
