
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.. जेव्हा जनता नाकारते तेव्हा पराभव स्वीकारून कामाला लागावं..

जिंकणाऱ्याची उणीदुणी काढू नयेत.. मी स्वतः पराभव पाहिलेला आहे.. त्याची सल माझ्याही मनात आहे.. पण त्या पराभवानंतर जेव्हा आपण वडगाव मार्केट कमिटी 18-0 ने जिंकली, केडीसी बँकेला मी बिनविरोध संचालक झालो, मुन्नासाहेब खासदार झाले, शिरोली ग्रामपंचायत मोठया फरकाने पुन्हा जिंकली, राजाराम कारखाना 21-0 ने जिंकला.. तेव्हा पराभूत झालेले आपले विरोधक असेच रडत होते. आपल्याला त्यांचा राग यायचा.. जर आज कर्नाटक निवडणुकीनंतर आपण तेच केलं तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक ?? भारतीय जनता पार्टी आणि महाडिक साहेब यांची एक शिकवण आहे.. विजय होवो अथवा पराभव.. संयम सोडायचा नाही.. शांत राहायचं.. आणि काम करत राहायचं.. आजचा दिवस त्यांचा आहे, विजयाचा आनंद घेऊ द्या.. आपण जिंकलो असतो तर आपणही आनंद साजरा केलाच असता.. माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना कुठेही गालबोट लागता कामा नये, याची काळजी घ्यावी.. बोलताना संयम राखावा.. शेवटी आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीत जो फरक आहे तो फरक कायम राहिलाच पाहिजे.. हा विषय राजकारणाचा नाही संस्काराचा आहे.. बाकी राजकारणात कधीही कोणी संपत नसतो, हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे.. त्यामुळे येणारा काळ आपलाच आहे.. संयमाने जग जिंकता येतं.. अश्या बऱ्याच लढाया येतील जातील.. जिंकायच्या असतील तर संयम महत्वाचा.. आज पराभव जरी झाला असला तरी विरोधकांचे आजपर्यंतचे ईव्हीएम वरील आरोप खोटे ठरले, तात्पुरतं हेसुद्धा पुरेसं आहे.. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात. अशी प्रतिक्रिया आमदार अमल महादेवराव महाडिक यांनी दिली आहे.
