
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भाजपला सत्तेतून जावं लागल्याचं चित्र आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीत भाजपचा प्रचंड पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी 104 जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत 69 जागांवरच आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे आठ मंत्रीही पिछाडीवर आहेत. कर्नाटकातील कल पाहता भाजपला 69, काँग्रेसला 120 आमि जेडीएसला 26 जागा मिळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसमधील उमेदवारांमधील मतांचं अंतरही खूप वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी होताना दिसत आहे. सध्या भाजपचे आठ मंत्री पिछाडीवर आहेत.
