
सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

सुपारीच्या पानांमध्ये अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणानंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.
खोकला, ब्राँकायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
विड्याचे पान अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान रामबाण -उपाय म्हणून मानला जातो. यासाठी सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.
