मेडिकल व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा समाज कल्याण समिती बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मेडिकल व इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्या बाबाच्या निर्णयाबरोबरच इतर अनेक विषयांवर आज (शुक्रवारी) झालेल्या समाजकल्याण समिती बैठकीत बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकी त इतरही विषयांवर चर्चा होऊन कामाना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मागासवर्गीय गावांना वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावे आहेत त्यांना समता निर्माण करणारे उदात्त्य नाव देणे बाबतचे ठराव एक आठवड्यात जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास योजनेअंतर्गत मार्च अखेरपर्यंत ज्या गावांनी शंभर टक्के खर्च केला नाही याबाबत अहवाल एक आठवड्याच्या आत समाज कल्याण विभागाकडे सादर करणेबाबत सूचना करण्यात आली.

तसेच रमाई वाचनालय अंतर्गत समाजामध्ये समता निर्माण करणाऱ्या लेखकांची पुस्तके शासकीय प्रेसमधून खरेदी करून देणे बाबत निश्चित करण्यात आली याबाबत पुस्तकांची निश्चिती करण्यात आली.मागासवर्गीय बचत गटांना त्यांचे अर्थाजन होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार होणाऱ्या फळावर प्रक्रिया निर्माण करणारी यंत्रे, रेशीम उद्योग यासाठी चालना देणारे यंत्रसामग्री व इतर साहित्य, मधुमक्षिका पालन करू इच्छिणाऱ्या बचत गटांना त्यांचे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना यंत्रसामग्री देणे तसेच पारंपारिक शेवया यंत्र, पापड करणे, कुल्फी तयार करणे इत्यादी यंत्राचे वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मागासवर्गीय वसाहतीमध्ये शारीरिक व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाकडील मंजूर मुक्त जिमचे स्पेसिफिकेशन प्रमाणे साहित्य खरेदी करून देण्याचे निश्चित करण्यात आले. मागासवर्गीय वसाहतीमध्ये असणाऱ्या कुस्ती खेळामध्ये आवड निर्माण होण्यासाठी तालीम तयार करण्याचे ठरवण्यात आले.अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल देण्याचे निर्णय घेण्यात आला. या बैठकीजिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे सहाय्यक लेखा अधिकारी संजय खारगे श्रीमती सुवर्णा नागरगोजे व पंचायत समिती कार्यालयातील समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🤙 8080365706