मोका चक्रीवादळाची तीव्रता वाढली

मुंबई : दिल्लीसह देशातील अनेक भागात तापमान वाढू लागले आहे. बंगालपासून बिहारपर्यंत अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. दुसरीकडे, मोका चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे.

12 मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ दुपारपर्यंत रौद्र रुप धारण करेल. यानंतर ते उत्तर-पूर्व दिशेला वळत पुढे जाऊ शकते.ते पूर्व बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. मोका वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात धडकणार आहे. 14 तारखेच्या सकाळी कॉक्स बाजार आणि क्यूप्यू दरम्यान कुठेतरी धडकणे अपेक्षित आहे.

🤙 8080365706