
पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्याचा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हे काम आता ७५ टक्के झाले आहे. तसेच पुढील वर्षी मार्चपर्यंत ते पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गवर वाहतुकीची कोंडी राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच या मार्गावरील अपघातही कमी होणार आहे. ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे.
