पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केली.

इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, ते इम्रान खान यांचा छळ करत आहेत. ते इम्रान खानला मारहाण करत आहेत. पीटीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खानचे वकील इम्रान खान गंभीर जखमी झाल्याचा दावा करत आहेत. इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटकेवर मात्र इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं न्यायाधीशांना म्हटलं आहे. कोर्टात हजर होण्यापूर्वीच इम्रान खान यांना अटक करण्यात आली. सरन्यायाधीशांनी आयजी इस्लामाबाद, गृह सचिव यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

🤙 8080365706