
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

दोन दिवसात सर्वोच्च न्यायलायाचा निकाल धडा शिकवणार आहे. गिर गई तो भी टांग उपर, अशी शिंदे गटाची अवस्था आहे, असंही ते म्हणालेत. राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात तोडगा निघेल. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल लवकरच लागले. हा निकाल शिंदेगटाला धडा शिकवणारा असेल, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.संजय राऊत यांचा गाढा अभ्यासक आहे. सामनाच्या अग्रलेखांने महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरवात होते. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष शिवसेनेसाठी महत्वाचे आहेत, असं ही विनायक राऊत म्हणालेत.
