सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी

बंगळूरू : निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकसाठी ‘सार्वभौमत्व’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

‘सार्वभौमत्व’ हा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईची मागणीही भाजपने केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाला निवेदनही दिले.भाजपने म्हटले की, भारतीय संघराज्यातील राज्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही आवाहन धोकादायक आणि घातक परिणामांनी भरलेले आहे. त्यामुळे अशा वक्तव्याबद्दल काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते तरुण चुघ यांनी केली.

🤙 8080365706