डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अटक

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांना दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी करत अटक केली आहे.

यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय संस्था असलेल्या संस्थेच्याच संचालकाला पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयावर अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला गोपनीय माहिती दिल्याने एटीएसने कुरुलकर यांच्या भोवतीचा फास आवळला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून चौकशी दरम्यान काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. जेएम रोडवर असलेल्या बालगंधर्व चौक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये विविध फलक घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. त्यामध्ये आंदोलकांनी डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

🤙 8080365706