
वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू लगाते. हार्मोन्सच्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल घडतात. वयाच्या चाळीशीनंतर वजन का वाढते? वजन वाढले तर तंदुरुस्त कसे राहता येईल? चाळीशीनंतर डाएटमध्ये कोणते बदल आणायचे? याबाबतीत माहिती.

डाएटच्या माध्यमातून व योग्य आहाराचे सेवन करून आपण वजन नियंत्रणात आणू शकता. यासाठी आहारात कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासह उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. आपल्या आहारात विविध धान्य, मसूर, बीन्स, फळे, भाज्या, नट्स यांचा समावेश करा. या प्रकारच्या आहाराने शरीराला फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे हे सर्व महत्त्वपूर्ण पौष्टीक घटक मिळतील.
आहारात साधे पाणी, सूप, मसूर आणि नारळ पाणी यांचा समावेश करा. शरीर डीहायड्रेट झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते.
महिलांना चाळीशीनंतर वजन वाढण्याची समस्या जास्त जाणवते. हे त्यांच्या चयापचयमुळे होते. यासह, प्री-मेनोपॉझल कालावधी सुरू होतो. ज्यामुळे शरीरात बरेच हार्मोनल बदल होतात. अशा वेळी डिप्रेशन व शरीराची हालचाल कमी होते. चाळीशीनंतर कॅलरी बर्निंग कमी होते.ज्या महिला नियमित व्यायाम करतात, त्यांना देखील वजन वाढीची समस्या छळते. विशेषतः पोटाची चरबी वाढते. या दरम्यान BMR (बेसिक मेटाबॉलिक रेट) 6% पर्यंत कमी होतो. या कारणांमुळे वजन तर वाढतेच, पण नॉर्मल वजन देखील सहजासहजी कमी होत नाही. या वयानंतर फिटनेसकडे अधिक लक्ष द्यावे लागते.
