कागल चा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासनाची” गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना राबवण्याची मागणी

कागल : गाव तलाव आणि धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी शासनाने “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत काढण्यात येणारा गाळ शासन स्वखर्चाने शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोच करणार आहे.त्यानुषंघाने कागल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक जयसिंगराव घाटगे तलावातील गाळ काढण्यासाठी व मुबलक पाणीसंचय होण्यासाठी शासनाची ही मोहीम तत्काळ राबवण्याची विनंती भारतीय जनता पार्टी कागल च्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे, तलावात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने यावर्षी हा तलाव एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरडा पडला आहे.तालावात पाण्याचा साठा फारच कमी झालेला आहे.यामुळे शहराला पाणीपुरवठ्याची मोठी समस्या भेडसावत आहे.ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना नगरपालिकेने प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार शासनाच्या वतीने गाळ शेतापर्यंत पोच केला जाणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये प्रमाणे हेक्टरी 35 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे विधवा,अपंग, आत्महत्याग्रस्तांचे कुटुंब, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्याच्या जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे.त्यामुळे कागल शहराला पाणीपुरवठा करणारा जयसिंगराव तलाव गाळमुक्त करण्यासाठी व शहराची पाण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी भाजप चे जिल्हाध्यक्ष राजे समरर्जीतसिंह घाटगे शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करणेस प्रयत्नशिल राहणार आहेत.तरी कागल नगरपालिकेने तत्काळ ही मोहीम राबवावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,शाहू कारखान्याचे संचालक बॉबी माने,सतीश पाटील, शाहू दूध संघाचे संचालक युवराज पसारे, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव,बाळासाहेब हेगडे,धीरज घाटगे,महेश माने, रमण घाटगे सह्या आहेत..

🤙 8080365706