अंबाबाईच्या चरणी तब्बल 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण

कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे कोल्हापूर वासीयांच श्रद्धास्थान म्हणून ओळखल जात. अंबाबाईच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात.आई अंबाबाईच्या आशीर्वादाने लाभलेल्या संपत्तीमधून काही भाग ते आईच्या चरणी अर्पण करत असतात.कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी असाच दानाचा ओघ सुरु असल्याच दिसून येत आहे.कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी तब्बल 47 तोळे सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.

जालना येथील एका आध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा मुकूट अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली. याआधी कोलकाता येथील एका भक्ताने 32 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका भक्ताने दीड कोटी रुपयांचे दागिने अंबाबाई चरणी दान म्हणून दिले होते.त्यानंतर आता 47 तोळे सोन्याचा दुसरा मुकूट देवस्थानच्या खजिन्यात जमा झाला आहे.मुकुट दान करणाऱ्याचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर संस्थानाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

🤙 8080365706