
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या निकालाची 38 लाखाहून अधिक विद्यार्थी वाट पाहत आहेत. यंदा सीबीएसई बोर्डाचे ( CBSE Board ) दहावी आणि बारावीचे 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण या आठवड्यात निकाल येणं अपेक्षित आहे.

सीबीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वीचा निकाल एकत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नसली तरी देखील 13 मे पूर्वी निकाल लागण्याची अपेक्षा आहे.सीबीएसईने बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in. या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
