
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोचा’ हे चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ओडिशा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला या वादळाचा जबर तडाखा बसण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 8 आणि 9 मे रोजी या पट्टय़ाचे भयानक चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला प्रचंड तडाखा बसण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
