यामुळे जास्त पैसै खर्च  न करता डासांच्या त्रासापासून सुटका मिळेल

उन्हाळ्याच्या दिवसात जास्त डास घरात येतात. पण डासांना पळवून लावण्यासाठी काही सोपे फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे जास्त पैसै खर्च  न करता डासांच्या त्रासापासून सुटका मिळेल.

लवंग आणि लिंबू  डास पळवण्याचा उत्तम उपाय आहेत. लिंबू कापून त्यात लवंग भरा. आणि घराच्या अशा कोपऱ्यावर ठेवा जिथे सगळ्यात जास्त डास येतात.  यामुळे डास घराबाहेर राहतील.

जर रात्री डास खूपच त्रास देत असतील आणि तुम्हाला इतर केमिकल्सयुस्त उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कापराचा वापर करू शकता . १५ ते २० मिनिटांसाठी कापूर जळण्यासाठी ठेवा. या उपायानं डास दूर पळतील.कडुलिंबाचे तेलकडुलिंबाच्या तेलाचा वापर डासांना पळवण्यासाठी केला जातो. कडुलिंब आणि नारळाचं तेल समान प्रमाणात घेऊन मिसळा.  हे तेल शरीराला व्यवस्थित लावा जवळपास ८ तास डास डास आजूबाजूला येणार नाहीत.

दिवसभर तुम्हाला डास चावत असतील तर निलगिरीचs तेल वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी निलगिरीच्या तेलात योग्य प्रमाणात  लिंबू मिसळा. हे तेल शरीलाला लावा यामुळे डास आसपास येणार नाहीत.

🤙 8080365706