
मलठण : भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित TDM या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला पाहिजे, तसेच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचा आरोप दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केला आहे.

त्यामुळे या संदर्भात पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ शिरुर शहरातुन ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या रॅलीची सुरवात करण्यात आली.
