माणूस हा बुद्ध धम्माचा केंद्र : प्रेमानंद मौर्य यांचे बुद्ध धम्मावर व्याख्यान

गारगोटी :” गौतम बुद्ध हे देव नसून ते मनोवैज्ञानिक आहेत जगातला स्त्री स्वातंत्र्याचा पहिला उद्गाता म्हणजे गौतम बुद्ध त्यांनी स्त्रियांच्या साठी अडीच हजार वर्षांपूर्वी स्वतंत्र संघ स्थापन केला होता समाजात समता बंधुता सर्वधर्मसमभाव निर्माण करू या ही बुद्धाची शिकवण आहे बुद्ध धम्म आणि धर्म यात फरक आहे निसर्गाचा एक स्वतंत्र धर्म आहे जीवन जगण्याचा संप्रदाय म्हणजे धर्म बुद्ध हा मार्गदाता आहे मोक्षदाता नाही” असे महत्त्वपूर्ण विचार प्रेमानंद मौर्य यांनी गारगोटी मध्ये अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केडी देसाई सभागृहात मांडले.

अध्यक्षस्थानी ख्रिश्चन धर्मगुरू संताजी होते या कार्यक्रमाला कोल्हापूर राधानगरी गारगोटी परिसरातील विविध धर्माचे अनेक स्त्री पुरुष उपस्थित होतेगडहिंग्लजच्या साधना शिक्षण संस्थेचे प्रमुख जे बी बारदेसकर म्हणाले सर्व धर्मांना सामावणारी अशी केंद्रे वाढायला हवीत भगवान बुद्ध हा महामानव देशाला मिळाला हे आपले भाग्य आहे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांनी शांतीचा संदेश साऱ्यांना दिला आणि परदेशातही हा बुद्ध विचार पसरलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा प्रकांड पंडित त्यांनी बुद्ध धर्माचा मोठा प्रसार भारतामध्ये केलाअकॅडमी ऑफ रिलीज युनिटी चे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी विविध धर्मांच्या तज्ञ लोकांच्या भाषणानंतर लवकरच सर्वधर्म मेळावा घेण्याची घोषणा केलीख्रिश्चन धर्मगुरू संताजी यांनी आपले जीवन अनुभव सांगितले त्याचा मतितार्थ असा होता की माणुसकीने वागताना धर्मभेद नाहीसा होतो आणि त्यामुळे मला मुसलमान हिंदू शिख धर्म भाऊ आणि बहिणी यांचे आजही प्रेम लाभलेले आहे विश्वास लाभलेला आहे त्यामुळे सर्वधर्मसमभाव हा या केंद्रातर्फे जोपासला जातो ही शिकवण मोलाची आहेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी बी पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन अनुबोध या मासिकाचे संपादक मिलिंद प्रधान यांनी केले.

🤙 8080365706