रिक्षा चालकाला मिळाली शिरच्छेद करण्याची धमकी

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून पुण्यातील रिक्षाचालक साधू मगर भाडे घेत नाही. यामुळे आता कट्टरपंथींनी त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे.

त्यांना कॉल करुन आणि मेसेजद्वारे राजस्थानच्या कन्हैयालाल सारखी तुमची परिस्थिती करु, अशी धमकी दिली आहे. या धमक्या परदेशातून येत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच धमकीचे पुरावेही दिले आहेत.

पुण्यातील ऑटो चालक साधू मगर यांनी 2 मे 2023 रोजी ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे न घेण्याची घोषणा करणारे पोस्टर बनवले होते. हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर एकीकडे त्याचे अनेकांनी कौतुक केले. दुसरीकडे त्यांच्या या निर्णयामुळे कट्टरपंथी लोकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी धमकी येणारे नंबर ब्लॉक करायला सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत आहे. विशेष म्हणून साधू यापूर्वी भारतीय लष्करातील जवानांकडूनही रिक्षा भाडे घेत नाहीत.

🤙 8080365706