
गारगोटी :पाल (ता.भुदरगड) गावचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबध्द असून ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार प्रकाश आबिकटर यांनी दिली ते. गावातील स्वत:च्या व जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी अर्जुन आबिटकर यांच्या विविध फंडातून मंजूर झालेल्या 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण समारंभा दरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की, गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजूटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहचवावीत. यापुढे ही गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये तलाठी कार्यालय 17 लाख 40 हजार, 25/15 हेड अंतर्गत रस्ता 10 लाख, आमदार स्थानिक विकास अंतर्गत रस्ता 20 लाख, अंगणवाडी इमारत 11 लाख 25 हजार, स्मशानभूमी बांधकाम 10 लाख, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते 72 लाख, जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना 16 लाख आदी कामांचा समावेश आहे.तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ.राहीणी आबिटकर यांच्या फंडातून आरोग्य उपकेंद्र दुरूस्ती 7 लाख 50 हजार, नळपाणी योजना 15 वित्त आयोग 3 लाख, शाळा दुरूस्ती 3 लाख, दलितवस्ती रोड 4 लाख, गटर्स दुरूस्ती 1 लाख 50 हजार, अंगणवाडी दुरूस्ती 1 लाख, उपकेंद्र पाल सुशोभिकरण 4 लाख आदी कामांचा समावेश आहे.यावेळी माजी सभापती सुनिल निंबाळकर, संजय पाटील, सरपंच सुशिला गुरव, उपसरपंच दिगंबर देसाई, अरुण पाटील, आर.पी.पाटील, दशरथ पाटील, गणेश पाटील, पोलीस पाटील सहदेव डवरी, विलास पाटील, अशोक यादव, संभाजी सरदेसाई, तलाठी श्री.पोरे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
