डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. यामुळे आपण आजारी असल्या सारखे दिसतो. डार्क सर्कलची ही समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी एक सोपा झटपट उपाय करु शकतो.

एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून कच्चे दूध घ्यावे त्यात १ टेबलस्पून आंबे हळद घालावी. या मिश्रणात प्रत्येकी १ टेबलस्पून मध व कॉफी पावडर मिसळून घ्यावी. आता हा डार्क सर्कल आय मास्क लावण्यासाठी तयार आहे. हा डार्क सर्कल आय मास्क बोटांनी आपल्या डोळ्यांभोवती लावून घ्यावा. हा मास्क डोळ्यांभोवती लावून झाल्यावर हलक्या हातांनी डोळ्यांभोवती मसाज करुन घ्यावा. १० ते १५ मिनिटे हा मास्क डोळ्यांभोवती तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुवून घ्यावा. हा उपाय आठवडाभर रोज केल्यास, एका आठवडत्यात तुमच्या डोळ्यांभोवती असणारे डार्क सर्कल्स घालवण्यास मदत होईल.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही डोळ्यांच्या डार्क सर्कल येऊ शकतात म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. २. झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते.

अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात. तसेच डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पध्दतीनं पुसणं हे डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरतं.४. लॅपटॉप, कंम्प्युटर, मोबाईल यांसारख्या गॅजेट्सचा वापर कमी प्रमाणात करा.

🤙 8080365706