
मुंबई : माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतरी संध्याकाळी 5.30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतरी संध्याकाळी 5.30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला.
