८ जून पर्यंत गोकुळवर कोणतेही कारवाई नाही

कोल्हापूर : सौ. शौमिका अमल महाडीक, संचालिका गोकुळ दूध संघ यांचे तक्रारीचे जनअनुषंगाने दुग्ध मंत्र्यांचे आदेशानुसार लेखा परीक्षण विभागाने चाचणी लेखापरीक्षण करणेचे आदेश दिले होते. सदर आदेशाविरुद्ध गोकुळ दूध संघाने मा. उच्च न्यायालय येथे रिट पीटीशन दाखल करुन दुग्ध मंत्र्यांचे व लेखा परीक्षण विभागाचे आदेश रद्द करणेची मागणी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असुन न्यायमूर्ती श्रीराम व न्यायमूर्ती पाटील यांचे खंडपीठाने पुढील सुनावणी दी. ८जून २०२३ पर्यंत चाचणी लेखापरिक्षण अहवालाबाबत शासनास पुढील कोणतीही कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत.

त्यामुळं विरोधकांनी सत्तेचा वापर करुन राजकीय द्वेषापोटी गोकुळ वरती प्रशासकीय कारवाई करण्याच्या उद्देशाने नेमलेल्या चौकशी बाबत दिनांक ८/६/२०२३ ई रोजी पर्यंत कोणतीही कार्यवाही करू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत .पुढील सुनावणी ८ जून २०२३ रोजी आहे . सदर आदेशामुळे सौ शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळ वरती राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे.

🤙 8080365706