शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव एकमताने मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे.

त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला होता. त्यासंदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण पवार साहेबांच्या निर्णयानंतर स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की शरद पवार असा काही निर्णय जाहीर करतील. आता आम्ही बैठकीत एक ठराव संमत केला आहे. हा ठराव सर्वसंमतीने केला आहे.

🤙 8080365706