राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची आज बैठक

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील असून त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव आज होणाऱ्या बैठकीत येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहतील याला सर्व निमंत्रित सदस्यांची तत्वत: अनौपचारिक मान्यता असेल अशी माहिती आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दुसरं एखादं पद तयार केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

🤙 8080365706