
उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाची मागणी वाढते कारण स्वयंपाकाशिवाय इतर थंड पेयांमध्ये लिंबाचा भरपूर वापर केला जातो. लिंबू खाल्ल्यानं शरीराला अनेक आरोग्यवर्धक फायदेसुद्धा मिळतात. लिंबू टिकवून ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स समजून घेतल्या तर तुम्ही महिनोंमहिने फ्रेश लिंबू साठवून ठेवू शकता.

सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीत सर्व लिंबू भरा. त्यात पाणी आणि व्हाईट व्हिनेगर घाला आणि ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या. या उपायानं लिंबू दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.
एका बरणीत टिश्यू पेपर ठेवून बरणीला आतल्या बाजूनं तेल लावून घ्या. नंतर लिंबांना तेल लावून भरणीत भरून हे लिंबू फ्रिजमध्ये ठेवा. या ट्रिक्सने ३ ते ४ महिने लिंबू खराब होणार नाहीत.
लिंबू साठवण्यासाठी प्लास्टिकचा हवाबंद डबा घ्या. त्यात पाणी घालून लिंबू साठवा. लिंबू साठवण्याची ही पद्धत लिंबू महिनाभर रसदार ठेवेल.
